लाडकी बहीण योजने मुळे खरचं शिक्षकांचे पगार रखडणार का?

या योजनेसाठी निधी वळवला जात असल्याच्या चर्चांमुळे शिक्षकांचे पगार रखडण्याची शक्यता वर्तवली जात होती

शिक्षण क्षेत्रात याचा ताण जाणवण्याची भीती अनेकांनी व्यक्त केली.

या पार्श्वभूमीवर, महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या चर्चांना उत्तर देत भूमिका स्पष्ट केली.

दिती तटकरे यांनी सांगितले की, शिक्षकांचे पगार योजनेसाठी वळवलेल्या निधीमुळे रखडणार नाहीत.

या संदर्भातील चर्चा पूर्णतः निराधार आहेत. नागपूर अधिवेशनात योजनेसाठी 125 कोटींची तरतूद करण्यात आली होती

आणि तीच रक्कम लाभार्थींच्या हप्त्यांसाठी वापरण्यात येत आहे. इतर कोणत्याही विभागाच्या निधीवर याचा परिणाम होणार नाही.

लाडकी बहीण योजनेचे हप्ते 24 डिसेंबरपासून लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होऊ लागले आहेत. येत्या 3-4 दिवसांत सर्व महिलांच्या खात्यांमध्ये पहिला हप्ता पोहोचेल, असेही त्यांनी सांगितले.