लाडकी बहीण योजनेला स्थगिती????

लाडकी बहीण योजनेतून आत्तापर्यंत २ कोटी २० लाखांहून अधिक पात्र महिलांना पाच महिन्यांचे हप्ते मिळाले आहेत. मात्र, निवडणुकांच्या काळात पुढील हप्ते मिळणार नाहीत

कारण ही योजना तात्पुरती थांबवण्यात आली आहे. तसेच, नव्या अर्जांचे स्वीकारणेदेखील बंद केले आहे.

आचारसंहिता लागू झाल्यामुळे, निवडणूक आयोगाने सरकारला आर्थिक लाभ देणाऱ्या योजना थांबवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

त्यामुळे महिला आणि बालकल्याण विभागाने लाडकी बहीण योजनेसाठी निधी देणं थांबवलं आहे.

ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे एकत्र दिल्यामुळे आता डिसेंबरचा हप्ता मिळण्याची प्रतीक्षा करावी लागेल.

मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी सर्व विभागांना विचारणा केली, आणि महिला व बालकल्याण विभागाने लाडकी बहीण योजनेचा निधी थांबवला असल्याची माहिती दिली.

For more information on Ladki Bahin Yojana follow us on ladkibahinyojana.org