लाडकी बहिण योजना: नवीन नोंदणीसंदर्भात महत्त्वाची माहिती, New Registration Update

मंत्री तटकरे यांनी या योजनेच्या नवीन नोंदणीबाबत मोठी घोषणा केली आहे.

त्यांनी सांगितले की, जेव्हा लाडकी बहिण योजनेसाठी सध्या दिली जाणारी 1500 रुपयांची रक्कम वाढवून 2100 रुपये करण्याचा अर्थसंकल्प सादर केला जाईल

तेव्हा नवीन नोंदणी सुरू होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यातील इतर पात्र महिलाही या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

या योजनेसाठी शेवटची नोंदणी तारीख 15 ऑक्टोबर होती. तेव्हा अडीच कोटींहून अधिक महिलांनी अर्ज केला होता

मात्र, अनेक महिला अजूनही नवीन नोंदणी सुरू होण्याची वाट पाहत आहेत.

राज्य सरकार ही योजना प्रत्येक गरीब महिलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे.

नवीन नोंदणी सुरू झाल्यानंतर महिला पुन्हा या योजनेसाठी अर्ज करू शकतील.