लाडकी बहीण योजने मुळे खरचं शिक्षकांचे पगार रखडणार का?

Teacher salary at risk due to ladki bahin yojana

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सुरुवात

राज्यात महायुती सरकारच्या कार्यकाळात सुरू झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ()हप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होऊ लागले आहेत. निवडणुकीतील आचारसंहितेमुळे योजनेचे हप्ते रोखले गेले होते, पण आता ते नियमित जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

शिक्षक पगारावर परिणाम होणार का?

Teachers salaries at risk due to Ladki Bahin Yojana?

या योजनेसाठी निधी वळवला जात असल्याच्या चर्चांमुळे शिक्षकांचे पगार रखडण्याची शक्यता वर्तवली जात होती. शिक्षण क्षेत्रात याचा ताण जाणवण्याची भीती अनेकांनी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर, महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या चर्चांना उत्तर देत भूमिका स्पष्ट केली.

अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांचे स्पष्टीकरण

अदिती तटकरे यांनी सांगितले की, शिक्षकांचे पगार योजनेसाठी वळवलेल्या निधीमुळे रखडणार नाहीत. या संदर्भातील चर्चा पूर्णतः निराधार आहेत. नागपूर अधिवेशनात योजनेसाठी 125 कोटींची तरतूद करण्यात आली होती, आणि तीच रक्कम लाभार्थींच्या हप्त्यांसाठी वापरण्यात येत आहे. इतर कोणत्याही विभागाच्या निधीवर याचा परिणाम होणार नाही.

हप्ते जमा होण्याची प्रक्रिया

लाडकी बहीण योजनेचे हप्ते 24 डिसेंबरपासून लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होऊ लागले आहेत. येत्या 3-4 दिवसांत सर्व महिलांच्या खात्यांमध्ये पहिला हप्ता पोहोचेल, असेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण ठरत असली तरी त्यासोबतच इतर विभागांवरील परिणामाबाबत उठलेले प्रश्नही महत्त्वाचे ठरतात. मात्र, सरकारने या विषयावर स्पष्टीकरण देत गोंधळ दूर केला आहे.

लाडकी बहिण योजना: नवीन नोंदणीसंदर्भात महत्त्वाची माहिती, New Registration Update

New Registration update of Ladki Bahin Yojana

लाडकी बहिण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) ही महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाची योजना आहे. गरीब कुटुंबातील महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे आणि त्यांचा जीवनमान सुधारणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

हप्त्यांच्या वाटपाची ताजी माहिती

महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या म्हणण्यानुसार, डिसेंबर महिन्याचा हप्ता 2 कोटी 34 लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पाठवण्याचे काम सुरू आहे. त्याशिवाय, आधार बँक खात्याशी लिंक केलेल्या 12 लाखांहून अधिक पात्र महिलांनाही हप्त्याचा लाभ दिला जाईल.

हप्त्यांच्या वाटपात उशीर

ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागू झाल्यामुळे या योजनेअंतर्गत हप्त्यांचे वितरण थांबवण्यात आले होते. मात्र, आता टप्प्याटप्प्याने पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यात 67 लाखांहून अधिक महिलांना हप्ता मिळाला आहे.

नवीन नोंदणीची शक्यता|New Registration Update

मंत्री तटकरे यांनी या योजनेच्या नवीन नोंदणीबाबत मोठी घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की, जेव्हा लाडकी बहिण योजनेसाठी सध्या दिली जाणारी 1500 रुपयांची रक्कम वाढवून 2100 रुपये करण्याचा अर्थसंकल्प सादर केला जाईल, तेव्हा नवीन नोंदणी सुरू होण्याची शक्यता आहे.
यामुळे राज्यातील इतर पात्र महिलाही या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

योजनेची पात्रता

  • ही योजना त्या महिलांसाठी आहे, ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे.
  • या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र महिलेला 1 जुलैपासून 1500 रुपये प्रतिमाह दिले जात आहेत.

जुनी नोंदणीची माहिती

या योजनेसाठी शेवटची नोंदणी तारीख 15 ऑक्टोबर होती. तेव्हा अडीच कोटींहून अधिक महिलांनी अर्ज केला होता. मात्र, अनेक महिला अजूनही नवीन नोंदणी सुरू होण्याची वाट पाहत आहेत.

सरकारचा प्रयत्न

राज्य सरकार ही योजना प्रत्येक गरीब महिलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. नवीन नोंदणी सुरू झाल्यानंतर महिला पुन्हा या योजनेसाठी अर्ज करू शकतील.

निष्कर्ष

लाडकी बहिण योजना गरीब महिलांना आर्थिक मदत देणारी एक महत्त्वाची योजना आहे. नवीन नोंदणी सुरू झाल्यानंतर अधिकाधिक महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतील. जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल, तर नवीन नोंदणीची घोषणा होईपर्यंत प्रतीक्षा करा.

Ladki bahin Yojana चा लाभ आता १२ लाख नव्या महिलांना, December हप्ता जमा सुरू!

Ladki bahin Yojana December Update

Ladki bahin Yojana चे लाभार्थी महिलांच्या संख्येत वाढ झाली आहे. आता १२ लाख नव्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.


लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर हप्ता

Ladki bahin Yojana December Update

  • ऑक्टोबर महिन्यात लाडकी बहीण योजनेचा शेवटचा हप्ता जमा करण्यात आला होता.
  • त्यानंतर निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे डिसेंबरचा हप्ता थांबला होता, पण आता नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर डिसेंबर हप्ता महिला खात्यांमध्ये जमा करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अधिवेशनात सांगितले होते की, डिसेंबर हप्ता लवकरच जमा केला जाईल.
  • यानुसार, लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

१२ लाख नव्या महिलांचा समावेश

  • आदिती तटकरे यांनी सांगितले की, योजनेच्या आधीच्या लाभार्थींमध्ये आता १२ लाख नव्या महिलांचा समावेश होणार आहे.
  • या महिलांना आधार कार्ड लिंक करण्यामुळे लाभ मिळण्यास सुरुवात होईल.

हप्त्याचे वितरण

  • डिसेंबर महिन्याचा हप्ता चार ते पाच दिवसांत टप्प्याटप्प्याने महिलांना दिला जाईल.
  • पहिल्या दिवशी ६७ लाख महिलांना हप्ता वितरित केला जाईल.
  • योजनेचा लाभ महिलांनी आपल्या आरोग्य, उद्योग, कुटुंबासाठी योग्य प्रकारे वापरावा, असे आवाहन आदिती तटकरे यांनी केले आहे.

महत्त्वाचे मुद्दे

  1. आधार सीडिंग: महिलांना आधार कार्ड लिंक करण्यामुळे योजनेचा लाभ मिळवण्यासाठी मदत होईल.
  2. हप्त्याचा उपयोग: महिलांनी हप्ता योग्य पद्धतीने, आपल्या गरजा आणि कुटुंबाच्या विकासासाठी वापरावा.
  3. योजना: लाडकी बहीण योजनेचे उद्दिष्ट महिला सक्षमीकरण आणि त्यांना आर्थिक मदत पुरवणे आहे.

लाडकी बहीण योजना महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण योजना आहे, ज्यामुळे त्यांना आर्थिक मदत मिळते आणि त्यांचे जीवन सुधारते.

लाडकी बहिण योजना: बदलांची शक्यता

changes in ladki bahin yojana

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले, आणि त्याचा फायदा भाजप महायुतीला झाला. यामागे लाडकी बहिण योजना हा मोठा कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे. या योजनेच्या निकषांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे

योजनेचा निवडणुकीतील प्रभाव

लाडकी बहिण योजना निवडणुकीपूर्वी सुमारे 2 कोटी महिलांच्या बँक खात्यात पाच महिन्यांची रक्कम जमा करण्यात आली. यामुळे महिलांचा महायुतीकडे कल वाढला. विरोधकांनी प्रचार केला की महायुतीला पुन्हा सत्ता मिळाल्यास ही योजना बंद होईल. मात्र, महायुती सरकारने योजना सुरूच राहील असे स्पष्ट केले आहे, पण काही बदल होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

काय बदल होऊ शकतात?

सध्याच्या निकषांनुसार एका कुटुंबातील सर्व महिलांना योजनेचा लाभ मिळतो. मात्र, लवकरच एका कुटुंबातील फक्त दोन महिलांनाच याचा फायदा दिला जाईल, असे बोलले जात आहे. योजनेत मिळणारी रक्कम (सध्या ₹1500) लगेच वाढवली जाणार नाही. आर्थिक शिस्त राखण्यासाठी हे बदल करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.

सध्याचे निकष

  • वय: 18 ते 60 वर्षे
  • कौटुंबिक वार्षिक उत्पन्न: ₹2.5 लाखांपेक्षा कमी
  • कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी किंवा आयकरदाता नसावा

लाडकी बहिण योजना 28 जून 2024 रोजी महाराष्ट्र सरकारने सुरू केली. या योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना मदत मिळते. या योजनेचे बदल महिलांसाठी फायदेशीर ठरतील की चिंताजनक, हे येत्या काळात समजेल.

लाडक्या बहिणींना दिला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलासा

Eknath shinde

नुकतीच लाकडी बहिण योजेने ला अचारसहिंते मुळे स्थगिती दिली असल्याने महिलांचा पूर्णपणे गोंधळ उडाला होता की पैसे येतील की नाही योजना सुरू राहील की नाही कारण सतत काही ना काही निगेटिव्ह गोष्टी कानावर पडत होत्या पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुक्ताईनगर मधल्या सभेत बोलत असताना सगळ्या लाडक्या बहिणींना दिलासा दिला आहे.

काय आहे हा दिलासा ?

Indian-women-standing-in-line-in-the-bank
Indian-women-standing-in-line-in-the-bank

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मुक्ताईनगरमध्ये आयोजित महायुतीच्या सभेत विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. या सभेत त्यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली. शिंदे म्हणाले की,

“कोणीही लाडकी बहीण योजना बंद पाडू शकत नाही. विरोधकांनी या योजनेत अडथळे आणले तर त्यांना योग्य उत्तर देऊ. या योजनेचे पैसे महिलांना मिळतच राहतील आणि वेळोवेळी ते वाढवले जातील.”

सध्या जरी आचारसहिंते मुळे जरी स्थगिती असली तरी ते पुढे म्हणाले की,

“डिसेंबर महिन्यात महिलांना योजनेचा हप्ता मिळेल. सुशिक्षित बेरोजगारांसाठी आपण पैसे देत आहोत, आणि सरकारी तिजोरीत सर्वात आधी बळीराजाचा हक्क आहे. नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना कधीही सोडले जाणार नाही.

महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेला स्थगिती????

ladki bahin yojana stopped

लाडकी बहीण योजनेतून आत्तापर्यंत २ कोटी २० लाखांहून अधिक पात्र महिलांना पाच महिन्यांचे हप्ते मिळाले आहेत. मात्र, निवडणुकांच्या काळात पुढील हप्ते मिळणार नाहीत कारण ही योजना तात्पुरती थांबवण्यात आली आहे. तसेच, नव्या अर्जांचे स्वीकारणेदेखील बंद केले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार असल्याचं जाहीर केलं आहे. आचारसंहिता लागू झाल्यामुळे, निवडणूक आयोगाने सरकारला आर्थिक लाभ देणाऱ्या योजना थांबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे महिला आणि बालकल्याण विभागाने लाडकी बहीण योजनेसाठी निधी देणं थांबवलं आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे एकत्र दिल्यामुळे आता डिसेंबरचा हप्ता मिळण्याची प्रतीक्षा करावी लागेल.

ladki bahin yojana new portal
लाडकी बहीण योजनेला स्थगिती????

लाडकी बहीण योजनेला स्थगिती का मिळाली?

निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे, मतदारांवर थेट प्रभाव टाकणाऱ्या योजनांना तात्पुरती थांबवावी लागते. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी सर्व विभागांना विचारणा केली, आणि महिला व बालकल्याण विभागाने लाडकी बहीण योजनेचा निधी थांबवला असल्याची माहिती दिली. म्हणून निवडणुका होईपर्यंत ही योजना तात्पुरती स्थगित केली आहे.

२ कोटींहून अधिक पात्र महिला

महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी ४६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जुलै महिन्यापासून सुरू झालेल्या या योजनेत २१ ते ६५ वयोगटातील, ज्यांचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपर्यंत आहे, अशा महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात.

Source: https://www.loksatta.com/maharashtra/ladki-bahin-yojana-suspend-by-government-after-election-commission-order-sgk-96-4660884/

लाडकी बहिण योजनेचा ३रा हफ्ता जमा कधी होणार?|Ladki Bahin Yojana 3rd Installment?

Ladki bahin Yojana 3rd installment

सगळ्या महिला सध्या आतुरतेने लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हफ्त्याची वाट पाहत आहेत. ज्यांना ह्या आधीचे दोन्ही हफ्ते मिळालेत ते ही आणि ज्या महिला आता योजने साठी पात्र झालेत त्याही. ज्या महिला पात्र झाल्या आहेत आणि अजून एकही हफ्ता जमा झाला नाही त्यांना तिन्ही हफ्ते एकत्र मिळणार असल्याने सगळ्या बँक अकाउंट सारखा सारखा चेक करत आहेत.
तर आपणा सगळ्यांना सांगताना छान वाटत आहे की तिसऱ्या हफ्त्याचा वाटप सुरू झाला असून लवकरात लवकर आपल्या अकाउंट मध्ये पैसे जमा होतील जर आपण अकाउंट आधार सोबत लिंक केला असेल.


मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत पात्र झालेल्या महिलांना पहिला हप्ता ऑगस्ट महिन्यात पात्र झालेल्या महिलांना त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला, पण काही महिलांना आतापर्यंत लाडक्या बहिणी योजनेचे लाभ अर्ज पात्र झालेले असून देखील मिळालेला नाही, अशा लाभार्थींना महिलांना आता सरकारकडून 29 सप्टेंबर ला लाडकी बहीण योजनेचे हप्ता मिळणार अशी तारीख जाहीर केली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांचे अर्ज जुलै ऑगस्ट महिन्यात पात्र झाले आहे त्यांना आता पर्यंत हफ्ता हस्तांतरित झालेला नाही अशा लाभार्थींना महिलांना सप्टेंबर महिन्यात ४५०० रुपये त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होणार आहे.

कोणत्या महिलांना फक्त १५०० रुपये मिळणार?

महिलांना पहिला हप्ता ऑगस्ट महिन्यात 3000 रुपये मानधन ( Ladki Bahin Yojana Hafta Credited) त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे अशा महिलांना सप्टेंबर महिन्यात फक्त 1500 रुपये हप्ता मिळणार आहे

माझी लाडकी बहीण योजनेचे नवीन पोर्टल सुरु

ladki bahin yojana new portal

माझी लाडकी बाहीण योजने ची नवीन ऑफिसिअल वेबसाईट सूर करण्यात आली आहे

लाडकी बहीण योजना ची नवीन  अपडेट अशी आहे कि आता लाडकी बहीण योजनेची नवीन वेबसाईट सुरु करण्यात आली आहे ज्या कारणाने आता फॉर्म भरणे सोप्पे झाले आहे व फॉर्म  भरण्याची मुदत हि ३१ आगस्ट पर्यंत आहे. 

आता पर्यंत योजनेला महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून महिलांची लांब च्या लांब रांगा लागत आहेत. पण आता नवीन पोर्टल च्या चालू झाल्याने फॉर्म भरणे खूपच सोप्पे झाले आहे. नवीन पोर्टल वर फॉर्म कसा भरावा हे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती व्यवस्तीत वाचा. 

नवीन पोर्टल वरून अर्ज करण्यासाठी ह्या नवीन वेबसाईट वर क्लिक करा: https://ladakibahin.maharashtra.gov.in

१. अधिकृत वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावरील “अर्जदार लॉगिन” च्या लिंकवर क्लिक करा

२. Do not have account Create Account वर क्लिक करा? चा पर्याय निवडा, जर तुम्ही खाते तयार केले असेल तर लॉगिनचा पर्याय निवडा.

३. तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला तुमचे पूर्ण नाव, मोबाईल नंबर, नवीन पासवर्ड, जिल्हा, तहसील, ग्रामपंचायत, गाव आणि तुमचा अधिकार निवडायचा आहे आणि कॅप्चा कोड टाकून साइनअप बटणावर क्लिक करा.

४. तुमच्या मोबाईल नंबरने लॉगिन करा आणि पासवर्ड तयार करा.

५. आता ऑनलाईन अर्जाचा फॉर्म तुमच्या समोर एका नवीन विंडोमध्ये उघडेल, ज्यामध्ये विचारलेली सर्व महत्वाची माहिती काळजीपूर्वक आणि योग्यरित्या भरा.

६. यानंतर तुम्हाला फॉर्ममध्ये विचारलेली कागदपत्रे अपलोड करा. 

७. तुम्हाला फॉर्मची शुद्धता तपासावी लागेल आणि सबमिट करावी लागेल.

८. तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर मिळेल, तुम्हाला स्क्रीन शॉट घ्यावा लागेल आणि/किंवा तो लिहून ठेवावा लागेल.

९. अशाप्रकारे तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बनी योजनेसाठी अगदी सहज घरी बसून ऑनलाइन अर्ज करू शकता.