नुकतीच लाकडी बहिण योजेने ला अचारसहिंते मुळे स्थगिती दिली असल्याने महिलांचा पूर्णपणे गोंधळ उडाला होता की पैसे येतील की नाही योजना सुरू राहील की नाही कारण सतत काही ना काही निगेटिव्ह गोष्टी कानावर पडत होत्या पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुक्ताईनगर मधल्या सभेत बोलत असताना सगळ्या लाडक्या बहिणींना दिलासा दिला आहे.
काय आहे हा दिलासा ?
![लाडक्या बहिणींना दिला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलासा 2 Indian-women-standing-in-line-in-the-bank](https://ladkibahinyojana.org/wp-content/uploads/2024/10/cropped-Indian-women-standing-in-line-in-the-bank.jpg)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मुक्ताईनगरमध्ये आयोजित महायुतीच्या सभेत विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. या सभेत त्यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली. शिंदे म्हणाले की,
“कोणीही लाडकी बहीण योजना बंद पाडू शकत नाही. विरोधकांनी या योजनेत अडथळे आणले तर त्यांना योग्य उत्तर देऊ. या योजनेचे पैसे महिलांना मिळतच राहतील आणि वेळोवेळी ते वाढवले जातील.”
सध्या जरी आचारसहिंते मुळे जरी स्थगिती असली तरी ते पुढे म्हणाले की,
“डिसेंबर महिन्यात महिलांना योजनेचा हप्ता मिळेल. सुशिक्षित बेरोजगारांसाठी आपण पैसे देत आहोत, आणि सरकारी तिजोरीत सर्वात आधी बळीराजाचा हक्क आहे. नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना कधीही सोडले जाणार नाही.“