सगळ्या महिला सध्या आतुरतेने लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हफ्त्याची वाट पाहत आहेत. ज्यांना ह्या आधीचे दोन्ही हफ्ते मिळालेत ते ही आणि ज्या महिला आता योजने साठी पात्र झालेत त्याही. ज्या महिला पात्र झाल्या आहेत आणि अजून एकही हफ्ता जमा झाला नाही त्यांना तिन्ही हफ्ते एकत्र मिळणार असल्याने सगळ्या बँक अकाउंट सारखा सारखा चेक करत आहेत.
तर आपणा सगळ्यांना सांगताना छान वाटत आहे की तिसऱ्या हफ्त्याचा वाटप सुरू झाला असून लवकरात लवकर आपल्या अकाउंट मध्ये पैसे जमा होतील जर आपण अकाउंट आधार सोबत लिंक केला असेल.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत पात्र झालेल्या महिलांना पहिला हप्ता ऑगस्ट महिन्यात पात्र झालेल्या महिलांना त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला, पण काही महिलांना आतापर्यंत लाडक्या बहिणी योजनेचे लाभ अर्ज पात्र झालेले असून देखील मिळालेला नाही, अशा लाभार्थींना महिलांना आता सरकारकडून 29 सप्टेंबर ला लाडकी बहीण योजनेचे हप्ता मिळणार अशी तारीख जाहीर केली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांचे अर्ज जुलै ऑगस्ट महिन्यात पात्र झाले आहे त्यांना आता पर्यंत हफ्ता हस्तांतरित झालेला नाही अशा लाभार्थींना महिलांना सप्टेंबर महिन्यात ४५०० रुपये त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होणार आहे.
कोणत्या महिलांना फक्त १५०० रुपये मिळणार?
महिलांना पहिला हप्ता ऑगस्ट महिन्यात 3000 रुपये मानधन ( Ladki Bahin Yojana Hafta Credited) त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे अशा महिलांना सप्टेंबर महिन्यात फक्त 1500 रुपये हप्ता मिळणार आहे