Ladki Bahin Yojana: माझी लाडकी बहीण योजना ची सुरुवात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्या द्वारे २८ जून २०२४ रोजी राज्याच्या आर्थिक बजेट मध्ये करण्यात आली, या योजने अंतर्गत राज्यातील सर्व महिलांना १५०० रुपये प्रति महिना थेट महिलांच्या बँक खात्यात मिळणार आहे, राज्यातील २१ वर्ष ते ६५ वर्ष वयोगटातील सर्व महिलांना आर्थिक स्वातंत्र्य, कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करणे आणि पोषण सुधारणे या उद्देश्याने राज्य सरकारने या महिला कल्याणकारी योजनेचा शुभारंभ केलेला आहे.
महाराष्ट्रातील महिलांमध्ये अनेमियाचे प्रमाण ५०% पेक्षा जास्त आहे, तसेच राज्यातील श्रमबल पाहणीनुसार पुरुषांची रोजगाराची टक्केवारी ५९.१०% व स्त्रियांची टक्केवारी २८.७०% आहेत हि वस्तुस्थिती लक्षात घेता महिलांच्या आर्थिक, आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे या करिता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ची सुरुवात करण्यात आलेली आहे.

या योजने अंतर्गत राज्यातील सर्व लाभार्थी महिलांना १५०० रुपये प्रति महिना आर्थिक मदद केल्या जाते ज्यामुळे महिला आपल्या पालन पोषण, स्वास्थ, आणि छोट्या मोठ्या गरजा पूर्ण करू शकते, महिलांना आता आर्थिकदृष्ट्या त्यांच्या परिवारांवर अवलंबून राहायची आवश्यकता नाही आहे।
या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून सर्व पात्र महिला ऑफलाईन आणि ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात, ऑफलाईन अर्ज महिला जवळील अंगणवाडी, ग्रामपंचायत किंवा CSC केंद्र मधून सादर करू शकतात।
माझी लाडकी बहीण योजनेची माहिती
| योजनेचे नाव | माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | महाराष्ट्रातील महिला |
| उद्दिष्ट | महिलांना आर्थिक सहायता व पोशनमध्ये सुधार करणे |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | २८ जून २०२४ |
| बांधकाम कामगार योजनेची अधिकृत वेबसाइट | ladakibahin.maharashtra.gov.in |
| बांधकाम कामगार योजना एप | Nari Shakti Doot App |
Ladki Bahin Yojana
Majhi ladki bahin yojana महाराष्ट्र राज्य सरकार द्वारे सुरु करण्यात आलेली एक योजना आहे, या योजने अंतर्गत राज्यातील २१ ते ६५ वर्ष वयोगटातील सर्व विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिलांना १५०० रुपये प्रति महिन्याची आर्थिक मदद राज्य सरकार द्वारे केली जाते।
या योजनेसाठी केवळ महाराष्ट्रातील महिला रहिवासी पात्र असतील आणि इच्छुक महिला या योजनेसाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज प्रक्रियेद्वारे अर्ज करू शकतात. राज्य सरकारने 1 जुलै 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू केली असून आतापर्यंत राज्यातील 3 कोटींहून अधिक महिलांना लाडकी बहिन योजनेचा लाभ मिळाला आहे.
Ladki bahin yojana online apply करण्यासाठी, राज्य सरकारने सुरू केलेल्या ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटवर महिला नोंदणी करू शकतात आणि त्यांचे अर्ज सबमिट करू शकतात आणि ज्या महिला ऑनलाइन अर्ज करू शकत नाहीत त्यांच्यासाठी ऑफलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करता येतो, या करिता महिला अंगणवाडी, ग्रामपंचायतमध्ये जाऊन अर्ज सादर करू शकतात, अर्ज करण्यासाठी, महिलांना फक्त आधार कार्ड, बँक पासबुक, रेशन कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र आणि जन्म प्रमाणपत्र हे सर्व कागदपत्र आवश्यक असतील.
ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर केल्यानंतर महिलांचे अर्ज तपासले जातील आणि त्या नंतर पात्र महिलांचे अर्ज स्वीकार करून लाभार्थी महिलांची यादी जाहीर केल्या जाईल, यादी अनुसार लाभार्थी महिलेला प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेपर्यंत १५०० रुपयांची मदद राज्य सरकार द्वारे केल्या जाईल.
लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता
- योजनेसाठी अर्ज करणारी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी.
- २१ ते ६५ वयोगटातील महिला अर्जदार पात्र असतील.
- राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला अर्ज करू शकतात.
- सादर योजनेंतर्गत लाभ मिळविण्यासाठी, अर्जदार महिलांचे बँक खाते असणे आवश्यक आहे आणि बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणे आवश्यक आहे.
- लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2.50 लाख पेक्षा जास्त नसावे.
- अर्जदाराकडे किंवा महिलेच्या कुटुंबाच्या नावावर ट्रॅक्टरशिवाय कोणतेही चारचाकी वाहन नसावे.
- महिला आणि कुटुंबातील सदस्य आयकरदाता नसावेत.
लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
Mazi Ladki Bahin Yojana साठी खालील कागदपत्रे लागतील:
- आधार कार्ड
- वोटर आईडी कार्ड
- पासपोर्ट साइज फोटो
- बँक पासबुक
- आधार कार्डशी जोडलेला मोबाईल क्रमांक
- रहिवासी दाखला
- शिधापत्रिका
- हमीपत्र
लाडकी बहीण नोंदणी शुल्क
- लाडकी बहीण योजनेसाठी महिला ऑनलाईन किंवा ऑफलाईन निशुल्क अर्ज करू शकतात, CSC केंद्र, किंवा सेतू सुविधा केंद्रातून केल्यास शुल्क लागू राहू शकतो.
लाडकी बहीण योजना ऑनलाइन फॉर्म
Maharashtra mazi ladki bahin yojana साठी ऑनलाईन अर्ज सादर करता येतो, त्यासाठी शासनाद्वारे पोर्टल तयार केले आहे, यावर आधार कार्ड नंबर व कागपत्र अपलोड करून लाभार्थी महिला निशुल्क अर्ज करू शकतो.
1Ladki bahin yojana online apply करण्यासाठी, तुम्हाला ladakibahin.maharashtra.gov.in या योजनेची अधिकृत वेबसाइट उघडावी लागेल, अधिकृत वेबसाइट उघडल्यानंतर, अर्जदार लॉगिन वर क्लिक करावे.

ज्यामध्ये तुम्हाला तुमचे नाव, पती/वडिलांचे नाव, पत्ता इत्यादी टाकावे लागतील आणि नंतर कॅप्चा प्रविष्टय करून Sign Up वर क्लिक करावे.




लाडकी बहीण योजना फॉर्म
Ladki bahin yojana साठी जर अर्जदार ऑनलाईन माध्यमाचा वापर करून अर्ज सादर करण्यास असमर्थ असेल तर खालील दिलेल्या फॉर्म द्वारे पात्र महिला ऑफलाईन अर्ज सादर करू शकतो, त्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून अर्ज डाउनलोड करा त्या नंतर प्रिंट काढून घ्या.
लाडकी बहीण योजनेसाठी ऑफलाईन अर्ज कसा करावा
- ऑफलाइन अर्ज करण्यासाठी महिलेला अंगणवाडी, ग्रामपंचायत किंवा आपले सरकार सेतू सुविधा केंद्रात जाऊन majhi ladki bahin yojana form maharashtra मिळवावा लागेल.
- अर्ज प्राप्त केल्यानंतर, महिलांना त्यांची संपूर्ण माहिती अर्जामध्ये प्रविष्ट करावी लागेल, जसे की महिलेचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक इ.
- यानंतर अर्जासोबत सर्व कागतपत्रे जोडायची आहे आणि कार्यालयामध्ये अर्ज जमा करायचा आहे.
- अर्ज जमा केल्यानंतर महिलेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने केला जाईल, त्यानंतर महिलेचा फोटो काढला जाईल आणि केवायसी करण्यात येईल.
- अर्ज जमा केल्यानंतर महिलांना अर्जाची पावती देण्यात येईल.
| लाडकी बहीण योजना फॉर्म PDF | डाउनलोड करा |
| लाडकी बहीण योजना हमीपत्र PDF | डाउनलोड करा |
Ladki Bahin Yojana 2025 Online Apply
माझी लाडकी बहीण योजना फायदे
- Mazi ladki bahin yojana च्या माध्यमाने शासन गरीब महिलांना ₹१५०० प्रति महिना आर्थिक सहायता प्रदान करते.
- राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून देऊन रोजगार निर्मितीला चालना देणे.
- महिलांचे आर्थिक आणि सामाजिक पुनर्वसन करून त्यांना स्वावलंबी बनवणे.
- राज्यात महिला सक्षमीकरणाला चालना देणे.
- महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांचे आरोग्य आणि पोषण स्थिती सुधारणे
लाडकी बहीण योजनेचे उद्दिष्ट
योजनेचे उद्दिष्ट खालील प्रमाणे:
- योजने अंतर्गत कामगारांना सुरक्षा तसेच आरोग्य व इतर कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देणे.
- बांधकाम कामगारांना उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून देणे.
- आर्थिक सहायता करून परिवारातील गरीब परिस्थिती व आर्थिक तंगी ला कमी करणे.
- कामगारांसाठी रोजगार क्षमता व रोजगाराच्या संधी मध्ये वाढ करणे.
- मजुरांना सामाजिक सुरक्षा उपलब्ध करून देणे.
- कामगार पाल्यांना शिक्षणासाठी प्रेरणा देणे.
- व्यावसायिक आरोग्य आणि कामगारांच्या सुरक्षेसाठी धोरणे / कार्यक्रम / योजना / प्रकल्प घालून आणि कामगारांच्या जीवनशैलीत सुधारणा करणे.
लाडकी बहीण योजना यादी
लाडकी बहिन योजनेसाठी अर्ज केल्यानंतर महिलांच्या अर्जांची छाननी केली जाते, त्यानंतर केवळ पात्र महिलांचे अर्ज स्वीकारले जातात आणि लाभार्थी महिलांची यादी जाहीर केली जाते, या यादीत समाविष्ट असलेल्या सर्व महिलांना योजनेअंतर्गत पुढे लाभ दिला जातो.
Mukhyamantri majhi ladki bahin yojana beneficiary list:
- यादी पाहण्यासाठी महिलांना नगर परिषद, जिल्हा परिषद किंवा महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.
- संकेतस्थळावर गेल्यानंतर महिलांना माझी लाडकी बहीण योजना यादी 2024 – 25 वर क्लिक करायचे आहे।
- त्यानंतर, एक नवीन पृष्ठ उघडेल, येथे तुम्हाला तुमचा प्रभाग क्रमांक निवडावा लागेल.
- प्रभाग निवडल्यानंतर download बटणावर क्लिक करा.
- यानंतर, लाभार्थी महिलांची जिल्ह्यानुसार लिस्ट pdf डाउनलोड होईल, या यादीमध्ये महिला त्यांची नावे तपासू शकतात.
Ladki Bahini Yojana Status
- लाडकी बहिन योजनेसाठी अर्ज केल्यानंतर महिला त्यांच्या अर्जाची स्थिती ऑनलाइन पाहू शकतात.
- अर्जाची स्थिती तपासण्यासाठी योजनेची अधिकृत वेबसाइट उघडा आणि लाभार्थी स्थितीवर क्लिक करा.
- यानंतर मेनू मध्ये अर्जदार लॉगिन वर क्लिक करा.
- आता लॉगिन पेज उघडेल इथे तुम्हाला मोबाईल नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा टाकावा लागेल आणि Login वर क्लिक करावे लागेल.
- तुमच्या मोबाईलवर OTP प्राप्त केल्यानंतर, तुम्हाला तो OTP वेबसाइटवर टाकावा लागेल आणि Get Data बटणावर क्लिक करावे लागेल.
- पोर्टलवर लॉगिन केल्यानंतर पुन्हा मेनू मध्ये क्लिक करा.
- इथे या पूर्वी केलेले अर्ज या पर्यायावर क्लीक करा.
- हे केल्यावर, एक नवीन पृष्ठ उघडेल, येथे तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये दिसेल.
Ladki Bahin Yojana eKYC कशी करायची
योजनेत होणारे गैरव्यवहार थांबवण्यासाठी, व योग्य महिलेला योजनेचा लाभ मिळावा यासाठी शासनाद्वारे सर्व पात्र महिलांना ekyc करण्याचे आदेश जाहीर करण्यात आलेले आहे, लाभार्थी योजनेच्या वेबसाईट वरून आपल्या आधार कार्ड केवायसी करू शकतात.
महिलांना नोव्हेंबर महिन्या पर्यन्त केवायसी करता येईल व ज्या महिला हि ई-केवायसी करणार नाही त्यांना योजनेतून वगळण्यात येईल व योजनेचा लाभ मिळणे सुद्धा बंद होईल, आधार कार्ड द्वारे kyc करण्यासाठी महिलांचे आधार कार्ड मोबाइल नंबर सोबत लिंक असणे गरजेचे आहे.
- eKYC करण्यासाठी योजनेचे पोर्टल ओपन करा.
- पोर्टल ओपन केल्यावर होम पेज वर ई-केवायसीच्या लिंकवर क्लिक करा.
- आता तुमच्या नामोर नवीन पेज उघडेल, इथे महिलेचा आधार कार्ड नंबर प्रविष्ट करा.
- यानंतर कॅप्चा भरून आणि मी सहमत आहे वर क्लिक करा आणि ओटीपी पाठवा बटन वर क्लीक करा.
- तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाइलला नंबर वर ओटीपी येईल तो पोर्टलमध्ये प्रविष्टय करा व सबमिट करा बटनवर क्लिक करा.
- या नंतर तुम्हाला वडील/पतीचे आधार कार्ड नंबर प्रविष्टय करून ओटीपी पाठवा वर क्लिक करायचे आहे.
- ओटीपी वेरिफिकेशन झाल्यावर, आपली जात आणि दिलेल्या पर्याय निवडा.
- त्यानंतर टिक बॉक्स मध्ये क्लीक करून खाली दिलेल्या सबमिट करा बटन वर क्लिक करा.
- अश्या पद्धतीने तुम्ही योजनेची ई-केवायसी पूर्ण करू शकता.
Installment Dates
| Installment | Date |
| 16th Installment (नोव्हेंबर हफ्ता) (Released Soon) | 4 डिसेंबर 2025 (शक्यता) |
| 15th Installment (ऑक्टोबर हफ्ता) (Released) | 4 नोव्हेंबर 2025 ₹ 1500 |
| 14th Installment (ऑगस्ट हफ्ता) (Released) | 11 सप्टेंबर 2025 (ऑगस्ट हफ्ता) |
| 13th Installment (जुलै हफ्ता) (Realeased) | 06 ऑगस्ट 2025 (जुलै हफ्ता) ₹ 1500 |
| 12th Installment (जून हफ्ता) (Released) | 07 जुलै 2025 (जून हफ्ता) ₹ 1500 |
| 11th Installment (मे हफ्ता) (Released) | 05 जून 2025 (मे हफ्ता) ₹ 1500 |
| 10th Installment (एप्रिल हफ्ता) (Released) | 03 मे 2025 (एप्रिल हफ्ता) ₹ 1500 |
| 8th Installment (फेब्रवारी हफ्ता) 9th Installment (मार्च हफ्ता) (Released) | 08 मार्च 2025 (फेब्रवारी हफ्ता) 12 मार्च 2025 (मार्च हफ्ता) (दोन महिन्यांचा हप्ता फेब्रवारी/मार्च) ₹ 3000 |
| 7th Installment (जानेवारी हफ्ता) (Released) | 25 जानेवारी 2025 (जानेवारी हफ्ता) ₹ 1500 |
| 6th Installment (डिसेंबर हफ्ता) (Released) | 25 डिसेंबर 2024 (डिसेंबर हफ्ता) ₹ 1500 |
| 4th Installment (ऑक्टोबर हफ्ता) 5th Installment (नोव्हेंबर हफ्ता) (Released) | 4 ऑक्टोबर 2024 (दोन महिन्यांचा हप्ता ऑक्टोबर/नोव्हेंबर) ₹ 3000 |
| 3rd Installment (सप्टेंबर हफ्ता) (Released) | 25 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2024 ₹1500 आणि ₹4500 |
| 1st Installment (जुलै हफ्ता) 2nd Installment (ऑगस्ट हफ्ता) (Released) | 14 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2024 ₹3000 (दोन महिन्यांचा हप्ता जुलै/ऑगस्ट) |
Ladki Bahin Yojana Maharashtra FAQ
Ladki Bahin Yojana Online Apply महाराष्ट्र link
लाडकी बहीण योजना महाराष्ट्र साठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे, महिला या ladakibahin.maharashtra.gov.in पोर्टल द्वारे ऑनलाईन अर्ज करू शकतात.
लाडकी बहीण योजना हमीपत्र PDF Download
लाडकी बहिन योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख राज्य सरकारने ३० ऑगस्ट २०२४ निश्चित केली होती, आणि नंतर ती ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.
Ladki Bahin Yojana हमीपत्र PDF Download
हमीपत्र तुम्ही योजनेच्या अधिकृत संकेतस्थळ, नारीशक्ती दूत एप वरून डाउनलोड करू शकता।
Ladki Bahini Yojana website
ladakibahin.maharashtra.gov.in हि लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाईट आहे.